सामाजिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शेतकऱ्यांसाठी पहिला मोर्चा — जयंती महोत्सवात इतिहासाला उजाळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण भारतीयांचे उद्धारकर्ते – दादाभाऊ अंभग

कल्याण – दि.१९ (महेंद्र सोनावणे)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त सामाजिक न्यायासाठी नव्हे, तर शेतकऱ्यांच्या आर्थिक हक्कांसाठीही ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. निलंगे (ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) येथे त्यांनी १९३८ साली पहिला शेतकरी मोर्चा काढून अन्यायकारक महसूल वसुलीविरोधात लढा उभारला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व भारतीयांसाठी केलेल्या विविध कामांची महती लोकांना सांगितली पाहिजे तरच आंबेडकर यांच्या जयंतीचे सार्थक ठरेल. असे उदगार जेष्ठ विचारवंत दादाभाऊ अंभग यांनी काल दिनांक १८ एप्रिल रोजी भवतू सब्ब मंगलम् यांनी आयोजित केलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितींना मार्गदर्शन करतांना सांगितले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती महोत्सव २०२५ भवतु सब्ब मंगलम् सामाजिक संस्था गोदरेज हिल, खडकपाडा कल्याण (पश्चिम) येथे जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महत्त्वपूर्ण विविध कार्याचे दाखले दिले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मध्ये अशा बाबींवर वक्त्यांची भाषणे असायला पाहिजेत. बाबासाहेब हे केवळ एकाच समाजाचे नेते नव्हते तर संपूर्ण भारतीयांसाठी ते कार्यरत होते हे अभ्यासकांनी आपल्या भाषणात सांगितले पाहिजे असे दादाभाऊ अंभग यांनी सांगून पुढे सांगितले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी काढलेल्या मोर्च्यात एक लाख शेतकरी सहभागी झाले होते.त्या काळात राज्यात दुष्काळाची स्थिती असूनही ब्रिटीश सरकारकडून शेतकऱ्यांकडून जमीनीवरील कर आणि कर्ज वसुली सुरू होती. शेतकरी वर्ग उध्वस्त झाला असतांना, सरकारच्या या धोरणाविरोधात आवाज उठवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते होते.त्यांनी हजारो शेतकऱ्यांना एकत्र करून निलंगे येथे मोर्चा काढला आणि “आमच्या जमिनी वाचवा, आमच्या हक्कांना न्याय द्या” अशी जोरदार मागणी केली.
या आंदोलनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिले की, सामाजिक समतेसह आर्थिक समताही तितकीच महत्त्वाची आहे. त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न हे दलित, बहुजन आणि सर्व श्रमिक वर्गाच्या हक्कांच्या लढ्याचा अविभाज्य भाग मानले.आजही निलंगेचा हा लढा शेतकरी हक्कांचा पहिला पुरोगामी संघर्ष म्हणून ओळखला जातो. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे हे योगदान पुन्हा एकदा अधोरेखित करतं की, ते केवळ संविधानाचे शिल्पकार नव्हते, तर शोषितांच्या सर्व स्तरांतील कैवारी होते.
दादाभाऊ अंभग यांनी भीमा कोरेगावचा विजयस्तंभाचा इतिहास ऐकवून आपणच विजय स्तंभाची न्यायालयीन लढाई लढत आहोत. या साठी येणारा खर्च मी स्वतःच करीत आहे. जर कुणाला या न्यायालयीन खर्चाच्या बाबतीत अर्थीक मदत करायची असेल तर जयंतीत होणारा खर्च कमी करा न्यायालयीन खर्चाची मदत करा असे आवाहन दादाभाऊ अंभग यांनी करताच कल्याण येथील सामाजिक कार्यकर्ते सदानंद गायकवाड यांनी तात्काळ एक लाख रुपयांची मदत जाहीर केली.
भीम जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नरेंद्र ताकसांडे ,किशोर धुमाळ, अमित शिरसाट, गजानन खंडेराव, योगेश लोखंडे, सत्यशीला शामकुवर, रमेश थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले तर भवतु सब्ब मंगलम सामाजिक संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष- हंसराज अंबेश, उपाध्यक्ष- अशोक त्रिभुवन, सचिव- आनंद आठवले, खजिनदार- वैशाली गोवंदे, रोशन शामकुवर , किसण वणे(मुख्य अभियंता),सत्यजित गोवंदे अमित शिरसाट,सत्यशीला शांमकुवर, एकनाथ गायकवाड ,चंदन झीमुर, सिध्दार्थ नीतनवरे, डॉक्टर अनिल उजागरे, श्रीधर साळवे ,किरण साळवे,शुद्धोधन इंगळे, शोभाताई इंगळे,राजेंद्र ओव्हाळ, राहुल कांबळे, रमेश थोरात, बि.डी सोनवणे, संजय मोरे ,संजय शिंदे, तुकाराम ढवळे, तुषार केदार, अमोल बी. गोटखिंडे, रोहित कांबळे, अविनाश इंगळे, वी. के. गौतम यांनी २०२५ या जयंती महोत्सवाची जबाबदारी स्विकारून यशस्वीपणे पार पडली.
दोन दिवसीय या जयंती महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, महिला सक्षमीकरणावर नृत्य नाटिका , आरोग्य शिबीर,वाद्यवृंद,स्नेह भोजन असे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन भवतु सब्ब मंगलम् सामाजिक संस्थेतर्फे करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!