बदली प्रक्रियेत लाभ मिळविण्यासाठी ग्रामसेवकांनी आणलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांची फेर वैद्यकीय तपासणी करा. भिवंडी तालुक्यातील नागरिकांच्या मागणीला जोर

(महेंद्र सोनावणे )
भिवंडी – दि. ९ आर्थिकदृष्ट्या संपन्न आसणा-या भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायतींमुळे ग्रामसेवकांना सुगीचे दिवस आले आहेत.हे सुगीचे दिवस कायम राहावेत यासाठी जिल्हा स्तरावर व तालुक्याच्या अंतर्गत स्तरावर झालेल्या बदली प्रक्रिया ही अन्यायकारक आहे अशी ओरड करीत जिल्हा स्तरावर बदली झालेले काही ग्रामसेवक हे न्यायालयात गेले आहेत तर,तालुका स्तरावर बदली झालेले ग्रामसेवक यांनी दिव्यांगाचे प्रमाणपत्र सादर करून मोक्याच्या व मलईची जागा पदरात पाडून घेतल्याचा प्रकार भिवंडी पंचायत समितीच्या ग्रामपंचायत प्रशासनात पार पडला आहे.बदली प्रक्रीयेतील कथित नाराजी नाट्याचा परिणाम अनेक नागरीकांना भोगावे लागत असल्याने शासनाच्या ग्रामविकास मंत्र्याने बदली घोळ प्रकरणी चौकशी करून तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून द्यावा अशा मागणीला भिवंडी तालुक्यातील जनतेने जोर धरला आहे.
भिवंडी तालुक्यातील काही ग्रामपंचायती या आर्थिकदृष्ट्या सक्षम आसल्या तरी तालुक्याच्या ग्रामीण भागात मागासवर्गीय बहुल संख्या असल्याने या तालुक्यातील ऐंशी टक्के ग्रामपंचायती या पेसा अंतर्गत शासकीय स्तरावर आहेत.पेसा अंतर्गत आसणा-या ग्रामपंचायतींवर पूर्ण वेळ ग्रामसेवक ग्रामपंचायतींवर हजर राहाणे असे बंधनकारक आसतांना ग्रामसेवक हे या ग्रामपंचायतींवर हजर न राहाण्याचे व्रत घेतले आहे.ग्रामपंचायतीचा कारभार शिपाई तसेच खासगी व्यक्तींकडून सोपवुन आपला पेसा कार्यकाळ पूर्णत्वास नेत आहेत.तर,मुळ ग्रामपंचायत पेसा असतांना पन्नास किलोमीटरवरील अतिरिक्त ग्रामपंचायत मोक्याच्या व मलईची घेऊन पेसा ग्रामपंचायतींना हरताळ फासला जात आहे हे वास्तव गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.
रोज प्रसिध्दी माध्यमांच्या समोर येवून सामाजिक कामांचा ढिंढोरा पिटणा-या तालुक्यातीलच आमदार, खासदार, यांच्या गावातच व हाकेच्या अंतरावरील ग्रामपंचायतींमध्ये हा सावळा गोंधळ राजरोसपणे सुरू आहे.विशेष म्हणजे या सावळागोंधळ प्रक्रियेत आमदार, खासदार यांचा वरदहस्त आहे.आमदार, खासदार यांनी आपल्या गावातील ग्रामपंचायत एकदा कायद्याच्या कक्षेत तपासून घेतले तर वस्तू स्थिती समोर येण्यासाठी कोणत्याही तक्ररी अर्जांची गरज नाही असे तालुक्यातील प्रशासनाची जाण असणा-या नागरिकांचे म्हणणे आहे.
ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक हा प्रथमदर्शनी विकासाचा कणा आहे.हा विकासाचा कणा जर डळमळीत असेल तर, या डळमळीत कण्यांकडून जनतेने कोणती अपेक्षा करावी असा प्रश्न विचारला जात आहे.ग्रामीण भागातील आमदार कधीतरी एखाद्या रस्त्याचे उद्घाटन करतांना समाज माध्यमांमध्ये दिसत असतात. भिवंडी लोकसभा खासदार बाळ्या मामा हे रोजच अधिकारी यांना खडेबोल सुनवतांना समाज माध्यमांवर दिसत आहेत.विकासाचा कणा आसणा-या ग्रामपंचायत अधिकारी यांच्या बदल्यांमध्ये होणारी अनियमितता यांच्यात लक्ष घालून जिल्हा परिषदेच्या अधिका-यांना जाब का विचारला जात नाही,असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांना पडला आहे.भिवंडी तालुक्यामधून इतर तालुक्यात बदली झालेले ग्रामसेवक हे पुन्हा दोन महिन्यांच्या कालावधीत भिवंडी पंचायतसमितीत येतातच कसे? या संदर्भात तालुक्यात राहाणारे आमदार, खासदार हे माहिती घेऊन अधिका-यांना जाब विचारण्याचे धाडस करतील काय?असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांचा आहे.
भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायतींवर कार्यरत असणाऱ्या काही ग्रामसेवकांनी भिवंडी तालुक्यामधून आपली बदली होवू नये,यासाठी दिव्यांगाचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणून आपली मलईची जागा घट्ट धरून ठेवली आहे.तालुक्यातील ज्या ग्रामसेवकांनी अलिकडचे दिव्यांग प्रमाणपत्रे सादर केली आहेत अशा सर्व प्रमाणपत्रांचे फेर वैद्यकीय तपासणी करावी अशी मागणी भिवंडी तालुक्यातील प्रशासनाची जाण असणारे नागरिक करीत आहेत.



