महाराष्ट्रात गाजत असलेला भीमा- कोरेगाव प्रकरणातील लढवय्ये योध्दा,निष्णांत कायदे पंडित ऍड. किरण चन्ने यांची भिवंडी वकील संघटनेच्या अध्यक्षपदी निवड.

सामाजिक जाण असलेले, भीमा कोरेगाव प्रकरणासाठी कायदेशीर लढाई लढणारे योध्दा आणि सामाजिक प्रश्नांचे जाण आणि वैचारिक बैठक असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले ऍड. किरण चन्ने यांची भिवंडी न्यायालय वकील संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीनंतर वकिलांमध्ये आणि समाजात आनंदाचे वातावरण आहे. न्यायासाठी झगडणाऱ्या नेतृत्वाची निवड झाल्यामुळे हा एक सर्व समावेशक सकारात्मक संदेश मानला जात आहे,अशा प्रतिक्रिया साहित्यिक, राजकीय, सामाजिक स्तरावर उमटत आहेत.
ऍड. किरण चन्ने हे अभ्यासू, प्रामाणिक आणि सामाजिक भान असलेले अधिवक्ता म्हणून ओळखले जातात. त्यांनी भीमा कोरेगाव येथील प्रकरणात न्यायासाठी ठाम भूमिका घेतली असून, वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांसाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या तळमळीच्या कार्यामुळे त्यांना समाजातील विविध स्तरातून पाठिंबा लाभला आहे.
वकील संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांच्या निवडीमुळे न्यायालयीन वकिली क्षेत्रात नवा उत्साह संचारला आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली वकिलांच्या समस्या, न्यायालयीन कार्यपद्धतीतील सुधारणा आणि सामाजिक न्यायासाठी नव्या दिशा उघडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
समाजहितासाठी लढणारे, न्यायव्यवस्थेतील पारदर्शकता जपणारे आणि सामाजिक समतेचे स्वप्न उराशी बाळगणारे ऍड. किरण चन्ने हे अध्यक्षपदावर विराजमान झाल्याने समाजात आशेचा किरण निर्माण झालं आहे.



