Uncategorized

श्वानप्रेम विरुद्ध नियमप्रेम: भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यावरून मंगेशी पॅराडाईज हौसिंग सोसायटीत वाद, पोलिसांचा हस्तक्षेप

कल्याण दि.८(प्रतिनिधी)
मंगेशी पॅराडाईज को-ऑ.हौसिंग सोसायटी शहाड (पश्चिम)मध्ये भाडेकरू आणि  सोसायट्यांचे फेडरेशनच्या चेअरमन यांच्यात भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्याच्या मुद्द्यावरून जोरदार वादावादी झाली. बुधवार दिनांक ६, रोजी  भाडेतत्त्वावर राहाणा-या व्यक्तीने सोसायटीच्या आवारातच भटक्या कुत्र्यांना खाऊ घातले, ज्यामुळे परिसरात अस्वच्छता आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला. यावर  चेअरमन यांनी आक्षेप घेतल्याने दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
       मंगेशी पॅराडाईज को-ऑपरेटिव हौसिंग सोसायटी शहाड या सोसायटीत सात माळ्यांच्या एकूण दहा इमारती आहेत. साडेतीनशे सदनिकाधारक तर पंधराशे लोकसंख्या असलेली ही सोसायटी आहे. या सोसायट्यांचे एक फेडरेशन आहे. सोसायटीच्या आवारात भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यास मनाई करण्यात आली आहे याचे पालन सोसायटीतील रहिवासी करीत असतांनाच भाडेतत्त्वावर राहणाऱ्या एका महिलेने सोसायटीच्या आवारात भटक्या कुत्र्यांना खाऊ घातले त्यावेळी सोसायटी चेअरमन सुलोचना किशोर पाटील या हजर होत्या.त्यांच्या समोर हि बाब होत असतांना त्यांनी फेडरेशनचे नियम समजावून सांगितले. चेअरमन आणि भाडेतत्त्वावर राहणाऱ्या व्यक्तीमधे शाब्दिक बाचाबाची झाली. भाडेतत्त्वावर राहाणा-या व्यक्तीने पोलीसांना बोलावले.
आश्चर्य म्हणजे, पोलिसांनी यामध्ये सोसायटीचे चेअरमन यांना धारेवर धरल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी श्वानप्रेमी व्यक्तीच्या बाजूने भूमिका घेतल्यामुळे इतर सदस्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

*कायदेशीर बाजू काय सांगते?*

2023 मध्ये लागू झालेल्या Animal Birth Control Rules (Rule 20) नुसार,

> “भटक्या प्राण्यांना खाण्यासाठीची व्यवस्था ही रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन किंवा स्थानिक संस्थेची जबाबदारी आहे. मात्र, ही व्यवस्था इतरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने करणे बंधनकारक आहे.”


सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयातही स्पष्टपणे म्हटले आहे की,

> “प्राण्यांना खाऊ घालायचं असल्यास ते स्वतःच्या घरात करावं, सार्वजनिक रस्ते किंवा गल्ल्यांमध्ये नको.”


चेअरमनची भूमिका आणि मागणी
या प्रकरणी चेअरमन यांनी स्पष्ट केले की,

> “सोसायटीच्या नियमांप्रमाणे आम्ही कोणत्याही प्राणीप्रेमाला विरोध करत नाही, पण त्यासाठी ठरावीक जागा आहे. मुख्य आवारात असे प्रकार घडल्यास लहान मुले, वृद्ध यांना धोका संभवतो.”


ते म्हणाले की, पोलिसांनी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय भूमिका घेऊ नये आणि सोसायटीच्या नियमांची अंमलबजावणीसाठी मदत करावी.
या प्रकरणामुळे प्राणीप्रेम आणि नागरी शिस्त यामधील संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावर तोडगा म्हणून सोसायटी प्रशासनाने लवकरच विशेष सर्वसाधारण सभा घेऊन,श्वानभक्त व्यक्तींना स्वतंत्र खाण्याची जागा देणे वेळ व अटींचे पालन सक्तीचे करणे यासारखे ठोस उपाय सुचवणे आहेत.

प्राण्यांविषयी सहानुभूती असणे गरजेचे असले तरी, ती इतरांच्या सुरक्षिततेच्या व सामाजिक शिस्तीच्या सीमेत असावी, हेच या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले. विशेष म्हणजे याच सोसायटीत राहणाऱ्या दोन व्यक्तींना भटक्या कुत्र्यांनी गंभीरपणे चावा घेतला होता, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कुत्रे पकडणारे यांना बोलवण्यात आले होते, कुत्रे घेऊन गेले आणि पुन्हा सोसायटीत आणून सोडले कुत्रांची नसबंदी केली आहे असा दावा पालिकेचा असलातरी आज भटक्या कुत्र्यांची संख्या सोसायटीच्या आवारात मोठ्या प्रमाणात आहे. आजही सोसायटीत कुत्रांचे लहान पिल्ले फिरत असल्याचे रहिवासी सांगत आहेत. सोसायटीच्या आवारात असणा-या भटक्या कुत्र्यांना लहानमुले तसेच लोक घाबरूनच ये- जा करीत आहेत.असे रहिवाशी सांगत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!