भारतीय संविधानावर आधारित देखावा व प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

कल्याण – प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त भारतीय संविधानावर आधारित देखावा आणि माहितीपूर्ण प्रदर्शनाचे आयोजन कल्याण – शहाड पश्चिम येथील मंगेशी पॅराडाईज सोसायटीच्या भव्य प्रांगणात करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन खडकपाडा पोलिस स्टेशनच्या साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आंबीका घस्ते यांच्या हस्ते करण्यात आले.या विशेष उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला., प्रदर्शन आणि देखावा पाहण्यासाठी लोकांची रीघ लागलेली होती.
या प्रदर्शनात भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीप्रक्रियेपासून ते त्यातील महत्वाच्या कलमांपर्यंतची माहिती प्रभावी पद्धतीने मांडण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाचे विविध पैलू, ऐतिहासिक दस्तऐवजांची छायाचित्रे, तसेच संविधानातील महत्त्वाचे मुद्दे आकर्षक पद्धतीने सादर करण्यात आले होते. विशेषतः युवक आणि विद्यार्थी वर्ग या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देखाव्यात संविधानाची सृष्टी जिवंत झाली होती. प्रत्यक्ष संविधान भवनाची प्रतिकृती पस्तीस फूट लांबीची साकारण्यात आली होती,
या कार्यक्रमाचे आयोजन मंगेशी पॅराडाईज सोसायटीतील बुध्दीस्ट गृपच्या सहकार्याने करण्यात आले होते. या देखाव्याची संकल्पना भारतीय संविधान प्रचारक पत्रकार महेंद्र सोनावणे (जादूगार एस्.महेंद्रा ) यांनी साकारली होती.या विषयी पत्रकार महेंद्र सोनावणे यांनी सांगितले की, “हे प्रदर्शन फक्त माहितीपर नाही तर प्रत्येक भारतीयाच्या संविधानाबद्दलच्या आत्मभानाला साद घालणारे होते.यासाठी विशेष मेहनत बाळू पवार, रोशन जाधव, प्रितम वाघचौडे, सागर जाधव, सुशांत संसारे, विनोद जगताप, निलेश मोरे, राजु थोरात,मिलिंद तायडे,निरज सिंह , माया गरूड,भारती धनवटे, रंजना जगताप, आदिंनी विशेष मेहनत घेतली.



