भिवंडी – दि. २७ मार्च: नागरिकांच्या तक्रारी अधिक प्रभावीपणे हाताळण्यासाठी आणि पोलिस दलाशी त्यांचा थेट संपर्क वाढवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी विविध अभिनव उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. उपक्रमांमुळे नागरिकांना पोलिसांशी त्वरित संवाद साधण्याची संधी मिळणार असून, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पोलिस यंत्रणा अधिक तत्पर राहणार आहे.याच संकल्पनेतून गणेशपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिपान सोनवणे यांनी अंबाडी विभागीय पोलिस उपअधीक्षक झाल्टे यांच्या मार्गदर्शनाखाली तक्रारदारांशी थेट संवाद अशी अभिनव संकल्पना राबविण्यात सुरुवात केल्याने गणेशपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नागरिकांनी या अभिनव संकल्पनेचे स्वागत करून समाधान व्यक्त केले आहे.महाराष्ट्र शासनाने राज्यातील प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिक- केंद्रीत करण्याच्या उद्देशाने ‘शंभर दिवस कृती आराखडा’ सुरू केला आहे.या कृती आराखड्याचा मुख्य उद्देश नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करणे आणि प्रशासनाची गुणवत्ता वाढवणे असे आहे. नागरिकांच्या तक्रारींची त्वरित आणि योग्य निपटारा करणे यासाठी गणेशपुरी पोलीस स्टेशननी हद्दीतील तक्रारींची दखल घेत तक्रारदार यांना दररोज सकाळी ११ ते दुपारी २.०० वाजेपर्यंत सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना प्रत्यक्ष भेटून आपल्या तक्रारीबाबत आपले मत व्यक्त करता येणार आहे. या संकल्पने बाबत साहाय्यक पोलिस निरीक्षक संदिपान सोनवणे यांनी सांगितले की, गणेशपुरी पोलीस स्टेशनप्रमाणेच अंबाडी विभागीय पोलिस उपअधीक्षक यांना सकाळी ११ ते दुपारी २.०० पर्यंत आपल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी थेट भेटता येणार आहे. थेट भेटीमुळे गणेशपुरी पोलीस ठाण्यात कौटुंबिक कलहांचे निवारण करण्यात आले तर एका वैवाहिक कुंटूंबाचे होणारे विभक्तापणा थांबवून एकत्र आणले आहेत.रोज तक्रारींचे निवारण होत आहे.या उपक्रमांमुळे पोलिस आणि नागरिक यांच्यातील अंतर कमी होत आहे आणि नागरिकांना अधिक सुरक्षित वाटत आहे. पोलिस दल अधिक पारदर्शक व लोकाभिमुख करण्यासाठी या संकल्पना महत्त्वाच्या ठरणार आहेत असे संदिपान सोनवणे यांनी सांगितले.
Related Articles
भिवंडी पंचायत समिती अंतर्गत “मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान” तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न.
September 5, 2025
भिवंडी महसूल विभागाच्या छत्रछायेखाली भिवंडी तालुक्यातील दगड खाणींमध्ये ब्लास्टिंगचे स्फोट.पूर्वसूचना न मिळाल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण.
May 10, 2025


