सत्य संविधान
newspaper ई-पेपर
search

नवी मुंबईत थरार! पारसिक हिलवरून कार थेट रेल्वे रुळांवर कोसळली; १६ वर्षीय तरुण गंभीर जखमी, लोकल सेवा विस्कळीत

Admin User

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

नवी मुंबईत थरार! पारसिक हिलवरून कार थेट रेल्वे रुळांवर कोसळली; १६ वर्षीय तरुण गंभीर जखमी, लोकल सेवा विस्कळीत
“

मंदिरात दर्शनासाठी आले होते कुटुंबीय; गाडीत बसलेला मुलगा जखमी, हार्बर मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प

नवी मुंबई: नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील पारसिक हिल परिसरात गुरुवारी दुपारी एक अत्यंत विचित्र आणि भीषण अपघात घडला. पारसिक हिलवर पार्क केलेली एक कार अचानक अनियंत्रित होऊन डोंगरकड्यावरून थेट खाली असलेल्या रेल्वे रुळांवर कोसळली. ही दुर्घटना दुपारी सव्वातीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास सीबीडी–उरण रेल्वे ट्रॅकवर घडली. या अपघातात कारमध्ये बसलेला १६ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे


पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाटील कुटुंब पारसिक हिलवरील प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिरामध्ये दर्शनासाठी आले होते. कुटुंबातील सर्व सदस्य कार सुरक्षित ठिकाणी पार्क करून मंदिरात दर्शनासाठी निघून गेले. मात्र, बारावीत शिकणारा १६ वर्षीय चिन्मय पाटील कारमध्येच थांबला होता.

काही क्षणांतच पार्क केलेल्या कारचे अचानक नियंत्रण सुटले आणि ती वेगाने उतारावरून घसरत थेट खाली असलेल्या रेल्वे ट्रॅकवर जाऊन आदळली. कार उंचावरून आदळल्याने तिचा चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, रेल्वे प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनात अडकलेल्या चिन्मयला अत्यंत शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढण्यात आले. त्याला तात्काळ कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

कार ज्या वेळी डोंगरावरून थेट रुळांवर पडली, सुदैवाने त्या क्षणी त्या ट्रॅकवरून कोणतीही लोकल ट्रेन जात नव्हती, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. खबरदारीचा उपाय म्हणून हार्बर आणि उरण मार्गावरील रेल्वे वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली.

रेल्वेच्या अपघात निवारण पथकाने (ART) क्रेनच्या साहाय्याने सायंकाळी ५ ते सव्वापाच वाजेच्या सुमारास अपघातग्रस्त कार ट्रॅकवरून बाजूला हटवली. त्यानंतर ट्रॅक आणि ओव्हरहेड वायरची सुरक्षितता तपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते पनवेल आणि उरण मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.

Admin User

Admin User

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

नवीनतम अद्यतन

पेसा ग्रामपंचायत म्हणजे काय? — पैसा नव्हे, गावाच्या अधिकाराची ताकद!
विशेष लेख

पेसा ग्रामपंचायत म्हणजे काय? — पैसा नव्हे, गावाच्या अधिकाराची ताकद!

ANCHOR AD SLOT